वयोमानपरत्वे जवळपास प्रत्येकच व्यक्तीत प्रेस्बायोपिया’ अर्थात ‘जरादुरदृष्टी’ किंवा ‘वृद्धापकाळातील दुरदृष्टी’ हा आजार उद्भवतो. वर्धा जिल्ह्याला या आजारापासून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नज फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी व आजार आढळून आलेल्या व्यक्तींना विनामुल्य चश्मे वितरीत केले जातील. प्रेस्बायोपिया निदान व प्रतिबंधासाठी वर्धेला ‘मॉडेल’ जिल्हा बनविण्यात येणार असून त्याच धर्तीवर पुढे संपुर्ण राज्यात ही