नागपूर ग्रामीण: आपली बसच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा: वृद्ध महिलेचे ३.५ लाखांचे दागिने व रोख रक्कम परत
'आपली बस' सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श समोर ठेवला आहे. १५ एप्रिल रोजी सुलोजना पाटील या वृद्ध महिला डोंगरगाव ते गुमगाव प्रवास करत असताना त्यांची पर्स बसमध्ये विसरली होती.पर्समध्ये सुमारे ३.५ लाख रुपये किमतीचे २ तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि १०,९५० रुपये रोख होते.बसमधील कंडक्टर भूषण कोरडे यांना तपासणी दरम्यान ही पर्स सापडली. त्यांनी तात्काळ डेपो व्यवस्थापक अजय इंगोले यांच्याकडे ही पर्स जमा केली.