काटोल: सिव्हिल लाईन येथे आयटेक संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांची भेट
Katol, Nagpur | Oct 16, 2025 आयटेक संघटनेच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी आणि बालवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला सिव्हिल लाईन येथे आज माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्याशी संवादही साधला. शेकडो महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.