आज दिनांक 16 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर शहरातील महात्मा फुले चौकात धनगर समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गायके यांनी स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे व म्हटले आहे, की या दीपक बोराडे ने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या ज्या योजना धनगर समाज बांधवांसाठी व विद्यार्थ्यांसाठी सुरू होत्या त्या योजनेची गळा दाबण्याचे काम केलं आहे,त्यामुळे आम्हा समाज बांधवांच्या मुलांचे नुकसान या दीपक बोराडे यांनी केला आहे,असा आरोप केला आहे.