बुलढाणा: धाड व धामणगाव बढे या गावांना तालुक्याचा दर्जा द्या - भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच नवीन २० जिल्हे व ८१ तालुके निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली आहे. या निर्णयाच्या अनुशंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज दि.१३ ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी ३ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील धाड व धामणगाव बढे या दोन गावांना तालुक्याचा दर्जा देण्याची आग्रही मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.