पालघर: विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथे पोलिसांवर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल तीन आरोपींना अटक
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कुर्जे येथे ग्रामस्थांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. याप्रकरणी विक्रमगड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 15 ते 20 ग्रामस्थांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 132, 189 (2), 190, 191 ( 2), 351(2), 352, 126 (2) अंतर्गत विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.