नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर भंडारा नगरपालिकेसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि मतदान साहित्याच्या पूर्ण सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी प्रभारी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केली. वैनगंगा सभागृह, पोलीस मुख्यालय, भंडारा येथे असलेल्या या स्ट्रॉंग रूमला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होत्या. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी...