खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार विक्रम साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच, स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी अत्रे यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर विक्रम साबळे आणि अश्विनी अत्रे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.