भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना नागपूर येथील विधान भवन परिसरात सरकारी यंत्रणेकडून धक्काबुक्की झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर डॉ. पडोळे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "खासदाराच्या प्रोटोकॉलचा विचार न करता धक्काबुक्की केली गेली. आम्हाला प्रेमाने सांगितले असते तरी समजले असते. पण, सरकारी यंत्रणेचा एवढा उद्दामपणा मी आजच पाहिला आहे," असे ते म्हणाले.