नागपूर ग्रामीण: वाडीत भीषण अपघात: ऑटोच्या धडकेत दोघे गंभीर जखमी, चालक फरार
वाडी पोलीस हद्दीतील अमरावती रोडवर एका भरधाव ऑटोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश वडतकर आणि त्यांचे मित्र संजय गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ऑटोचालक घटनास्थळावरून पळून गेला. वाडी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. जखमींवर लक्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.