साकोली: खैरलांजी येथे भर दुपारीच रोवायला गेलेल्या एकाच्या घरी सोनेचे दागिने व नगदी पैशाची झाली चोरी
साकोली तालुक्यातील खैरलांजी येथील अमर लांजेवार यांचे सर्व कुटुंबीय शेतात रोवण्यासाठी गेले असताना शनिवार दि.5जुलैला दुपारी2ते 3च्या दरम्यान त्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 21 हजार 700 रुपये नगदी व 5000 रूपये किमतीचे एक ग्रॅम सोन्याचा डोरला व चार सोन्याचे मणी चोरून नेले आहे ही माहिती भंडारा जिल्हा पोलीस वार्तापत्राद्वारे रविवार दि सहा जुलैला एक वाजून तीस मिनिटांनी देण्यात आली आहे अज्ञात चोरट्याविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे