भोकरदन: दानापूर, सुरंगळी परिसरात बरसल्या पावसाच्या सरी, उकाड्यापासून नागरिकांचे सुटका
आज दिनांक 9 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापुर सुरंगळी परिसरामध्ये अचानक पावसाच्या सरी बरसले आहे, या अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे नागरिकांची तारांबळ जरी उडाली असली मात्र उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले आहे,तसेच ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मिरची लागवड केली आहे त्या उन्हाळी मिरचीला सुद्धा या सरीमुळे काही काळ थंडावा निर्माण झाला असून 15 ते 20मिनिटे हा पाऊस झाला आहे.