मारेगाव: 80 हजाराची लाच स्वीकारताना महिला सरपंच लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात, नवरगाव येथील घटना
मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथील महिला सरपंच हिने संरक्षण भिंतीच्या देयके धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी तब्बल 80 हजार रु. ची मागणी केल्याने फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून अँटी करप्शन ब्युरो पथकाने ताब्यात घेतले. सुचिता फुलू कुमरे असे आरोपी सरपंच महिलेचे नाव आहे.