हिवाळी अधिवेशनात दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी २.२५ वाजता आमदार नाना पटोले यांनी मोठा गौप्यस्फोट करत सरकारला धारेवर धरले. सरकारने स्वतःहून हे मान्य केले आहे की, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना टार्गेट दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बोगस फॉर्म भरून घेण्यात आले, ज्यामुळे अधिकृत आकडेवारीत गंभीर तफावत निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांनी सरकारच्या योजनांना सहकार्य केले असले तरी, 'जनतेचे पैसे' असलेल्या या संपूर्ण प्रक्रियेत जी गडबड झाली, त्याचे गुन्हेगार नक्की कोण, असा थेट आणि आक्रमक प्रश्न..