सावंगी शिवारामध्ये जुगार अड्ड्यावर फुलंब्री पोलिसांनी छापा टाकून दोन लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी तीन जण फरार झाले असून तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले.