मुक्ताईनगर: ओझरखेडा धरणात सोडले पाणी; शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला
हतनूर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरातील शेतीला संजीवनी मिळेल आणि अन्नधान्य उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.