अहिल्यानगर महापालिकेतर्फे ) शहरांमध्ये कचरा संकलनासाठी ८० घंटा गाड्या दाखल झाल्या. या घंटागाड्यांमध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आले. आज प्रत्यक्षात शिवसेनेचे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी या गाड्यांची पाहणी केली असता या गाड्यांमध्ये ओला कचरा व सुका कचरा एकत्रच गोळा केला जात असल्याचे निदर्शनास आलं. आयुक्तांनी ८० गाड्यांचं श्रेय घेणे हे चुकीचे आहे. २०२० साली ५० घंटा गाड्या या महापालिकेचा कचरा गोळा करण्यासाठी दाखल झाल्या होत्या