भोकर: पिंपळढव शेतशिवारात तळ्यात गेलेल्या जमिनीचा शासनाकडून मोबदला मिळाला कमी; 23 वर्षीय तरूणाने विषारी औषध पिऊन केली आत्महत्या
Bhokar, Nanded | Oct 22, 2025 नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे पिंपळढव शेत शिवार येथे दि 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास यातील मयत नाने मारोती नरसिंग करेवाड वय 23 वर्ष यांची तळ्यात गेलेल्या जमिनीचा शासनाकडून मोबदला कमी मिळाल्याने कोणते तरी विषारी औषध पिऊन मरण पावले. या प्रकरणी खबर देणार नरसिंग करेवाड यांनी दिलेल्या खबरीवरून आज रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान भोकर पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कळणे हे आज करीत आहेत