समुद्रपूर: शेगाव (घोटाळ्या)शिवारात भरधाव ट्रॅक्टरची बकरीला धडक:बकरी जागीच ठार
समुद्रपूर तालुक्यातील कोरा नंदोरी रोड वरील शेगाव शिवारात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने बकरीला धडक दिली यात बकरीचा मृत्यू झाल्याने मेढपाळाचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर वद्यै राहणार शेगाव हे लहान मोठ्या २४ बकऱ्या घेऊन चारण्यासाठी नेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने यातील एका बकरीला धडक दिली.यावेळी ज्ञानेश्वर यांनी ट्रॅक्टर चालकास नुकसान भरपाई मागीतली असता त्याने शिवीगाळ केली.