समुद्रपूर: जाम शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह :पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान
जाम शिवारातील एचपी पेट्रोलपंपाच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांत नोंद करण्यात आली असून श ओळख पटविण्याचे आव्हान ६ पोलिसांकडून करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार राजू भाऊराव अवघडे जाम) यांनी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली.मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे असून रंग निमगोरा आहे. डोक्यावरील व दाढीवरील केस काळे-पांढरे असून अंगात निळ्या रंगाची गोल गळ्याची हाफ बाहींची टाकली आहे.