समुद्रपूर: घोंसा शिवारात वाघाच्या हल्ल्यात गोर ठार:शेतकऱ्यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान
रासा येथील शेतकरी जगदीश महातळे यांच्या घोंसा शिवारातील शेतामध्ये चरत असलेल्या त्यांच्या गोऱ्यावर वाघाने हल्ल्या करीत ठार केल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार शेतकरी जगदीश महातळे यांचे जनावरे त्यांच्या शेतामध्ये चरत असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने गोऱ्यावर हल्ला करीत ठार केले याची माहिती वनपरीश्रेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना देताच त्यांनी वनरक्षक गोहणे यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला.याठिकाणी वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले