राजूरा: बामणवाडा परिसरात एमआयडीसीतील प्लास्टिक भंगाराला लागली आग; नागरिकांच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ
राजुरा तालुक्यातील बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका प्लास्टिक भंगार व्यवसायिकाच्या ठिकाणी आज दि. २२ ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे ७:३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच या आगीने रुद्ररूप धारण केले.या परिसरात अंगद नगर, आयटीआय,नरसिंग कॉलेज, दाल मिल तसेच भांडार गोडाऊन असल्याने मोठ्या अनर्थाची भीती निर्माण झाली होती.