स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) भालेराव यांनी केलेल्या कारवाईत, पवनी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा वाही येथे अवैध रेती चोरी व वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना दिनांक 09 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:00 वाजेच्या सुमारास घडली. सपोनि भालेराव हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना, मौजा वाही येथे टिप्पर क्रमांक एम.एच. 32/ए. जे. 2999 चा चालक-मालक, आरोपी प्रज्वल विनोद गायकवाड (वय 22 वर्ष, रा. कोरंभी) हा कोणत्याही वैध पास-परवान्याशिवाय रेतीची चोरटी...