कोपरगाव तालुक्यात अनेक परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. याला पोहेगाव परिसर देखील अपवाद नाही. बिबट्याच्या धास्तीने रात्री शेतात शेतीला पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक झाले आहे. थंडीची लाट व वन्य प्राण्यांची दहशत यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तातडीने परिसरात पोहेगाव सबस्टेशन मधून शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी आज २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी महावितरणकडे केली आहे.