आज दिनांक 8 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नळणी येथे शेती शिवारात गट क्रमांक 135 मध्ये कपाशीच्या शेतात लागवड केलेली 21 गांजाची झाडे याची वजन 19 किलो 800 ग्राम व किंमत 4 लाख 95 हजार ही पोलिसांनी गुप्त खबरेमार्फत जप्त करत शेतकरी राजीव सिंगल याला ताब्यात घेऊन भोकरदन पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई भोकरदन महसूल विभागाचे नायब तहसीलदार पोपलवाड व भोकरदन पोलिसांनी केली.