चिखलदरा: पोलीस स्टेशन हद्दीत तरुणीचा विनयभंग;अनोळखी व्यक्तीवर चिखलदरा पोलिसात गुन्हा दाखल
चिखलदरा तालुक्यातील एका गावात घरात एकटी असलेल्या तरुणीला अनोळखी व्यक्तीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी १:३० वाजता घडली आहे.या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी दुपारी १ ते १:३० वाजताच्या दरम्यान फिर्यादी महिला घरी एकटी असताना एक अनोळखी व्यक्ती तिच्या आंगणात आला.त्याने फिर्यादीच्या नातेवाइकांबद्दल विचारणा केली.