गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी (दि. १४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. रिमाजी दादाजी खेडेकर (वय ४५) असे शेतकऱ्याचे नाव आहे. रिमाजी खेडेकर हे घराचे काम सुरू असल्याने जुने घर ते बांधकाम सुरू असलेले नवीन घर या मार्गाने ये-जा करीत होते. अशातच अडगडीत असलेल्या विहिरीजवळ पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.