नाशिक: नाशिकरोड भागात बेशिस्त व नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलीसांचा कारवाईचा बडगा
Nashik, Nashik | Oct 23, 2025 गुन्हेगारी नंतर आता पोलीस प्रशासनाने वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले असून नाशिकरोड भागात बेशिस्त व नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये रिक्षांची तपासणी करून पोलीस पथक कारवाई करत आहे.