चिखलदरा: खटकालीत दोन गटांत धुमश्चक्री; काठी-विटांच्या मारहाणीने तरुण जखमी, परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल
चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात रविवारी रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन गटांत झालेल्या भांडणातून काठी व विटांच्या मारहाणीचे प्रकार घडले.या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूचे तरुण गंभीर जखमी झाले असून,परस्परांविरुद्ध चिखलदरा पोलीस ठाण्यात दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी १:१७ मिनिटांनी तक्रारी दाखल झाल्या आहेत.पहिल्या घटनेत,कु.सक्राय जांभेकर (२२) ही आजोबांच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेली असता, आरोपी प्रकाश दादू कास्देकर व निर्मला कास्देकर यांनी फिर्यादीच्या डोक्यावर काठी व गुंड मारुन जखमी