अकोला जिल्ह्यातील वडद खुर्द येथील १९ शेतकऱ्यांच्या शेतीतून मंजूर केलेला रस्ता आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी खारीज केला आहे. तहसील स्तरावरचा निर्णय आव्हान देत शेतकऱ्यांनी अपील दाखल केले होते. अँड. अक्षय दामोदर यांनी ठोस पुरावे आणि कायदेशीर युक्तिवाद सादर करून विरोधकांचा बचाव खोडून काढला. या खटल्यात अँड. कश्यप अहिर आणि एका साथीदाराने त्यांना सहकार्य केले. न्यायालयाने दिलेल्या निकालाने शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला.