जळगाव बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पोत लांबवणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. याप्रकरणी बुधवारी 31 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता बुलढाणा जिल्ह्यातील दोन महिलांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.