भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दि. २३ डिसेंबर रोजी टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू व जुगाराचे ७ अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. यात ७ आरोपींच्या ताब्यातून ५१ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर आरोपींवर साकोली, अड्याळ, जवाहरनगर, कारधा, गोबरवाही व पालादुर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान एका प्रसिद्ध...