अकोट: शिवाजीनगर परिसरातील पुरातन कालंकादेवी मंदिरात खासदार अनुप धोत्रे यांनी घेतले कालंकादेवीचे दर्शन
Akot, Akola | Sep 29, 2025 शहरातील मोठे बारगण परिसरातील शिवाजीनगर मध्ये असणाऱ्या पुरातन कालंका देवी मंदिरात खासदार अनुप धोत्रे यांनी कालंका देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी शहरातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना भेट देऊन विविध ठिकाणच्या सार्वजनिक दुर्गा मातांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी कार्यकर्ता यांची उपस्थिती होती तर अकोट शहरातील पुरातन कालंका देवी मंदिरात यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी देवीचे दर्शन घेत पूजन केले संस्थान द्वारा त्यांचे स्वागत करण्यात आले.