माजलगाव: शेतकऱ्यांच्या उसाला 03 हजार 500 रुपये भाव द्या, शेकपच्या वतीने माजलगाव मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्याच्या ऊसाला प्रति किंटल ३५०० रुपये भाव द्यावा. या मागणीसाठी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे विविध पक्ष संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उसाला किमान ३५०० रुपये प्रतिटन हमीभाव द्यावा, या मागणीसाठी आज छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शेतकरी संघटनांसह विविध पक्ष समर्थकांनी रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सरकारकडून उसाच्या दरात तफावत आढळली.