जालना: जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई; 96 गुन्हे दाखल, 5 जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई
Jalna, Jalna | Apr 23, 2026 जालना जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत 96 गुन्हे दाखल केले असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार दि. 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक पावले उचलली आहेत. सन 2025-26 या वर्षात जिल्ह्यात पर्यावरण परवानगी असलेल्या 55 वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली होती.