अकोला: एन एच एम कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा,राज्य समन्वयक डॉ. रामू नागे यांची माहिती
Akola, Akola | Nov 7, 2025 अकोला : राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीस मान्यता दिल्याने आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण आहे. राज्य समन्वयक डॉ. रामू नागे यांनी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता सांगितले की, या निर्णयाचा लाभ अकोला जिल्ह्यातील सुमारे २५० कर्मचाऱ्यांना मिळणार असून, १५ ते २० वर्षांपासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळेल. या निर्णयामुळे आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल, असेही त्यां