नागपूर ग्रामीण: नागपुरात किचनमध्ये शिरला ५ फुटी कोब्रा; सर्पमित्राच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ
बेलतरोडी परिसरातील शंकरपूर येथे एका कुटुंबाच्या किचनमध्ये ५ फूट लांबीचा विषारी कोब्रा नाग शिरल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी नाश्ता बनवत असताना ही घटना घडली.श्रीमती शारदा संतोष यांच्या घरातील किचनच्या कपाटात हा साप शिरल्याचे पाहून कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा केला. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण प्रचंड घाबरले होते.