जालना: जालन्याच्या निरखेडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत खोतकर दिसले पंचाच्या भूमिकेत
Jalna, Jalna | Apr 5, 2026 आज दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मिळाल्या माहितीनुसार जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी पंचाची भूमिका निभावली आहे. जालन्यातील निरखेडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत खोतकर यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी खोतकर यांनी चक्क पंचाची भूमिका पार पाडली. स्वर्गीय पैलवान भानुदासराव राजे जाधव व्यायाम शाळा, निरखेडा यांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील अनेक पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या