भारतीय जनता पक्षात वसई विरार येथील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे. नालासोपाराचे आमदार राजन नाईक भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी वसई विरार परिसरातील विविध पक्षातील तरुण, युवा आणि महिलांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.