नांदेड: नांदेड शहरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; भर उन्हात एकाकी पडलेल्या पावसामुळे जनजीवन झाले विस्कळित
Nanded, Nanded | Nov 3, 2025 आज सोमवार दि 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत कडाक्याची उंतापत असताना अचानक दुपारी अडीच ते तीन ढगाळ वातावरण निर्माण होऊन नांदेड शहरातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला वजीराबाद विष्णूनगर गोकुळ नगर सोमेश कॉलनी हिंगोली गेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अचानक पडलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे आज रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान पाहाव्यास मिळाले आहे काल रविवार दि 2 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यासाठी एक दिवसासाठी येल्लो अलर्ट जारी केला होता.