, आज दिनांक 27/11/24 रोजी स्था. गु. शा. चंद्रपूर ने पो. स्टे. चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपिनीय माहिती वरुन आरोपी रोशन कामडी वय २९ रा. गनुरवार चौक, बाबुपेट चंद्रपूर, याचे घरी प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू चार साठा असल्याबाबत माहिती मिळाली असता, आरोपी नामें रोशन कामडी यास ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती घेतली असता २४,१२५/-रू चा प्रतीबंधक सुगंधित तंबाखू मिळून आल्याने माल जप्त करुन आरोपीस ताब्यात घेऊन पोस्टे चंद्रपूर शहर येथे अप क्रं ९८४/२०२४ कलम २२३,२७५ भा.न्या.सं सह कलम 30(2), 26(2) (अ), 3, 4, 59(1) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्हा नोंद केला.