वर्धा: वेतन त्रुटी दुरुस्तीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
Wardha, Wardha | Sep 22, 2025 वेतन त्रुटी तात्काळ दूर करून न्याय मिळावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आजपासून काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची सुरुवात आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) निवेदन देऊन करण्यात आली.