जालना: पाहेगावात मध्यरात्री धाडसी चोरी; 3 लाख 49 हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास
Jalna, Jalna | Jun 16, 2026 जालना जिल्ह्यातील शेवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहेगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल 3 लाख 49 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेवली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वाघु राठोड (वय 40, व्यवसाय शेती, रा. पाहेगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.