जालना: परतूर येथे रेल्वे उशिराने येत असल्याने प्रवाशांचे हाल; डबे वाढवण्याची रेल्वे संघर्ष समितीची मागणी
Jalna, Jalna | May 7, 2026 मनमाड-हुजूर साहेब नांदेड (गाडी क्र. 57652) ही रेल्वे परतूर येथे नियमितपणे उशिराने येत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गुरुवार दि. 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गाडी वेळेवर चालवावी तसेच डब्यांची संख्या वाढवावी, या मागणीसाठी परतूर रेल संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. समितीने दिलेल्या निवेदनानुसार, गाडी क्र. 57652 ही रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज किमान दोन तास उशिराने परतूर रेल्वे स्थानकावर पोहोचते.