महागाव: हिवरा संगम येथे एकाच रात्रीत २ ज्वेलर्स दुकानात चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास
महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी २ ज्वेलर्स दुकानांचे कुलूप तोडून लाखोंची चोरी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. शुक्रवारी रात्री साई व खंडेलवाल ज्वेलर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन लाखोंचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.तसेच गावातील दोन दुचाकीही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा करण्यात आला आहे.