चिखलदरा: वडाळी शेतशिवारात वाघाचा संचार;पाळीव प्राण्याची शिकार;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वडाळी शेतशिवार परिसरात वाघाचा संचार असल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली असून वाघाने एका पाळीव प्राण्याची शिकार केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या एक महिन्यापासून दहिगाव, हिरापूर आणि आता वडाळी परिसरात वाघाने पाळीव जनावरांची शिकार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सततच्या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, वनविभागाची अद्याप ठोस कारवाई दिसून येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.