जालना: उड्डाणपुलाजवळील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराची दुरुस्ती करा; मनसेचे महापौर वंदना मगरे यांना निवेदनउड्डाणपुलाजव
Jalna, Jalna | Jul 1, 2026 जालना शहरातील उड्डाणपुलाजवळ असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे व यश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रवेशद्वाराची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन त्याची त्वरित दुरुस्ती करून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी करण्यात