आमदार डॉ. परिणय फुके यांच्यावर एका व्यक्तीने केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारच्या आरोपांची हवाच निघाली असून, स्वतः फुके यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार व खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. कथितरित्या बॅंकेला मूर्ख बनवून १५ एकर जमिनीवर १०० कोटींचे कर्ज घेतल्याचा हा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, मी यापूर्वीही कर्ज उचल केले आणि परतफेडही केली. ही बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेली कृती असल्याचे डॉ. फुके यांच्याकडून 8 नोव्हे