जालना: 15 वर्षांपासून प्रलंबित पोलीस पाटील भरती प्रक्रिया जालन्यातील 24 परीक्षा केंद्रांवर यशस्वीरित्या पार पडली..
Jalna, Jalna | Oct 13, 2025 15 वर्षांपासून प्रलंबित पोलीस पाटील भरती प्रक्रिया जालन्यातील 24 परीक्षा केंद्रांवर यशस्वीरित्या पार पडली.. आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा प्रशासनाने मागील 15 वर्षांपासून प्रलंबित असलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया अखेर यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील 724 पदांसाठी रविवारी (12 ऑक्टोबर 2025) सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत जालन्यातील 24 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा शांततेत घेण्यात आली. एकूण 8,163 उमेदवारांपैकी 7,843