अचलपूर: अंबाडा कंडारी येथे विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ; पतीसह चौघांविरुद्ध छळप्रकरणी गुन्हा दाखल
तालुक्यातील अंबाडा कंडारी येथील 22 वर्षीय विवाहितेने कौटुंबिक छळाची तक्रार अचलपूर परतवाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून पतीसह कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी विवाहितेच्या जबानीनुसार, 29 एप्रिल 2025 रोजी सायं. 6 वा. पासून ते 16 जून 2025 रोजी पहाटे 4 वा. या कालावधीत नमूद आरोपींनी तिला माहेरी जाऊ नये, नोकरी करू नये तसेच घराच्या टेरेसवर जाऊ नये यासाठी शिवीगाळ करून धमक्या दिल्या. यासोबतच तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या